भुत एक अनुभव....
भुत एक अनुभव
ही खरी घडलेली कथा आहे माझ्या आजोबांच्या बाबतीत, अंदाजे 1934-1935 सालाची गावाकडे पूर्वी लाईट नसलेने माणसे कंदिल वापरत असत व गावाकडे घड्याळ पण नसलेत जमा आणि झाडे ही खुप होती म्हणजे दिवसा जाणं भितीदायक
अशाच हिवाळयाच्या दिवसातला अनुभव आजोबांचा,
गाव जे आहे ते चहु बाजूने डोंगर झाडे वनराईन नटलेले
अशा एका दिवशी आजोबांना त्याच्या आईने बैल चारायला उद्या धामना (डोंगराच नाव आहे) तेथे घेऊन जा त्यावेळी बॅटरी नसलेने कंदिल वापरत मग आजोबा तरूण होते 17- 18 वयाचे
मग पहाटे पहाटे जाऊ अस वाटल म्हणून कोंबड आरवल की जाऊ पण त्या दिवशी 2.30 ते 3 वाजता कोंबड। आरवलाचा आवाज झाला आजोबाना वाटल पहाट झाली ते बैलाला घेऊन निघाले गावाची वेस ओलांडलावर गावाच्या स्मशानभूमीकडे वाटेवर आजोबांना एक पांढरे कपडे घातलेला माणूस दिसला आजोबाना वाटल बर झाल सोबतीला भेटल म्हणून आजोबा त्याला आवाज देऊ लागले आर थांब की मला पण येऊ दे जाऊ सोबत तो माणूस थांबेना अस तीन चार वेळा झाल आजोबाच्या हातात बैलाचा दोर होता आवाज आजोबांनी मारले किवा कीती जोरात चालले तरी माणूस आणि आजोबा अंतर कमी होत नवतं मगu आजोबाना वाटल हे कहीतरी वेगळं आहे म्हणून ते मटकी च्या शेतात बैलाचा कासरा हाताला गुंडाळून लपून बसले
आणि पहाट झालावर बैल सोडून घरी आले त्यावेळी बैल सोबत नसता तर आजोबा त्या माणसाने सोडलेच नसते
घरी आलावर आजीने भैरवनाथाचे आभार माणले आणि बैलाच्या पाया पडली पोराला संकटातून वाचवलं.असा एक थरारक अनुभव आजोबांनी सांगितला....
समाप्त....
प्रा राहूल तायडे
वाई.
Comments
Post a Comment