केंजळ गावातील बालपणीचे दिवस....
केंजळ गावातील बालपणीचे दिवस.... माझ गाव तस विदर्भातलं अमरावती पण आईच्या नोकरी निमित्त केंजळ ला आलो माझा जन्म पण केंजळचा, व्यक्ती किती मोठा झाला तरी तो आपल्या बालपणीचे दिवस, ते सवंगडी विसरुं शकत नाही. केंजळ गाव तस सुंदर चारही बाजूने हिरव्या गार वनराईन नटलेलं, जस जस समजायला कळत झाल्यावर बालवाडीत नाव टाकलं त्यावेळी बालवाडी महालक्ष्मीच्या देवळात भरायची, माझ्या आवडीच्या शिक्षिका बागल बाई खूप लाड करायच्या, इथेच पहिला श्री गणेशाने सुरवात झाली नविन मिञ भेटले स्वप्निल , जयंत , योगेश सागर मजा येयची, बालवाडीत गाणी, खेळ आई माझ पञ हरवल , पकडा पडकी असे खेळ आम्ही रहायला जगताप बंधू च्या घरी तिथे सर्वांनी छान संभाळून घेतल अशोक काका मला नांगरावर बसायला नेयचे कधी मी मागं लागायचो नांगरावर मजा येयची माती कशी भुसभुशीत होयची कधी बैल ( सुंदर, नाजूक) जोरात शेपुट मारायचे तोंडावर तोंड चांगलं शेकून निघायचं पण कूळवावर बसायची मजा औरचं, पावसाळ्यात खुप मजा यायची घर रानात असल्याने पाऊस मनासारखा अनुभवता आला गारा वेचून खाल्या, घरामागे तिन आंब्याची झाडे आहेत खुप आंबे पाड...