केंजळ गावातील बालपणीचे दिवस....
केंजळ गावातील बालपणीचे दिवस....
माझ गाव तस विदर्भातलं अमरावती पण आईच्या नोकरी निमित्त केंजळ ला आलो माझा जन्म पण केंजळचा, व्यक्ती किती मोठा झाला तरी तो आपल्या बालपणीचे दिवस, ते सवंगडी विसरुं शकत नाही.
केंजळ गाव तस सुंदर चारही बाजूने हिरव्या गार वनराईन नटलेलं, जस जस समजायला कळत झाल्यावर बालवाडीत नाव टाकलं त्यावेळी बालवाडी महालक्ष्मीच्या देवळात भरायची, माझ्या आवडीच्या शिक्षिका बागल बाई खूप लाड करायच्या, इथेच पहिला श्री गणेशाने सुरवात झाली नविन मिञ भेटले स्वप्निल , जयंत , योगेश सागर मजा येयची, बालवाडीत गाणी, खेळ आई माझ पञ हरवल , पकडा पडकी असे खेळ
आम्ही रहायला जगताप बंधू च्या घरी तिथे सर्वांनी छान संभाळून घेतल अशोक काका मला नांगरावर बसायला नेयचे कधी मी मागं लागायचो नांगरावर मजा येयची माती कशी भुसभुशीत होयची कधी बैल ( सुंदर, नाजूक) जोरात शेपुट मारायचे तोंडावर तोंड चांगलं शेकून निघायचं पण कूळवावर बसायची मजा औरचं,
पावसाळ्यात खुप मजा यायची घर रानात असल्याने पाऊस मनासारखा अनुभवता आला गारा वेचून खाल्या, घरामागे तिन आंब्याची झाडे आहेत खुप आंबे पाडायचो दगडाने अगदी नेम धरून, सगळीकडे हिरवं हिरवं आजी चुलीवर भुईमुगाच्या शेंगा भाजायची ह्या दिवसात एक नंबर लागायची चव, हरभरा चा हावळा आणि ज्वारी चा हूरड्याची चव न्यारीच..
घरी एक कुञा होता राजा नावाचा तो रोज आई डयुटीवर जाताना तिला बस स्टॉप वर सोडायला जायचा अन राञी घरची राखन करायचा किती ईमानी असता ना हे प्राणी एकदा नागाला पण अडवून ठेवेल होत राजानी
सूट्टीत विहीरित पोहणं हे ऊन्हळयात रोजचचं सूऴका मूटका असे प्रकार करायचो मजा यायची.
आमच्या घरमालकाची शेती डोंगराजवळ होती ''खलवा'' नाव त्याच पावसाळ्यात मस्त झरे व्हायचे मी आणि अमोल खेकडे मासे पकडायचो
कधी पाननिवळी सोबत खेळायचो भूक लागल्यावर घरून आणलेली चटणी भाकरी मस्त लागायची कधी झाडाखाली खोपटात🏕 (झोपडीत) फिस्ट करायचो मसाले भात😋😋छान मजा येयची.
बेंदरादिवशी सकाळी राजुमामा दोन बैलाना धुवायचा आम्ही जायचो आणि बैलाना आंघोळ घालायचो मी सुंदर नावाच्या बैलाची मानेखालची पोळी खाजवायचो त्यालापण छान वाटताच मारत नव्हता गरीब होता..
बेंदराला मस्त पीवळा रंग मारून त्यावर रंगीत कलरने छाप उठवायचो निसर्ग चिञ काढायचो मग झुल बाशिंग चढवून बैल वाजत गाजत गावात मारूतिच्या मंदिराला फेरी मारून घरी आणायचे आजोबा बैलाच्या समोर पार (लोखंडी सळई) आवडी जमिनीवर टाकायचे कदाचित बैलजोडीला द्रृष्ठ लागू नये म्हणून मग बैलाना घरच्या स्ञीया ओवाळायच्या, ज्वारीच्या खायला देयची आणि सुपात राहीलेली ज्वारी धान्याच्या कोठीत टाकायची समज असा की धान्य संपू नये बरकत यावी हा ज्यानी बैलानी पिकवल त्याच ऋण म्हणून, मग मस्त पुरणपोळी आमटी खाऊन आम्ही खेळाला पळायचो
टु व्हीलरचे टायर पळवायची मजा यायची, विटी दांडू, सुरपारंब्या, विष की अम्रृत, लपाछपी, गोट्या, आकारा टोकरा असे खेळ खेळण्यात मजा यायची.
डोंगरात आसलेल्या कडजुबाई देवीला निवध घेऊन जायचा आणि ओला नारळ फोडून तिथेच फस्त करायचा. डोंगराकडे रानात बोर आन आंब्याची झाडे आहेत खूप गोड आंबा अजूनही आहे कुठेही गेलो तरी राजा कुञा सोबतीला असे आमचा Bodyguard त्याला मी एक भाकरी शेत असे शेपूट हलवून तो आभार मानत असे आंब्याखाली सावलीत छान आम्ही झोप काडत असू आमचा सचिन अण्णा मध काढण्यात पटाईत तो आम्हाला मध काढून देत असे अस मध आता नाही मिळत, गोड जांभळे, करवंदे खायची मजा औरच , नारळाची बॅट करून खेळायचो बॅट बाॅल मजा यायची.
बैलगाडी चालवायला मजा यायची काका व राजुमामा देयचे बैल माझ्या हातात वाटायच आपल्या सांगण्यावरून बैल चालतात. काकांमूळे मी पिकाची पेरणी, नांगरणी, कुळवणी, फणणी शिकलो घरामागे गुरव काकांची विहीरित आहे लहाणपणी आम्ही दगडांच्या थारूळ्यात आंघोळ करायचो आता सगळ बंद झाल. आता बदलत्या जमान्यात बादलीन पाणी काढायची विहीरवर लावलेली चाके (रहाट) बंद झाली.
दिवाळी त फटाके कमी मिऴायचे मग फूसके फटाक्यांचा दारू काढून पेटवण्यात मजा यायची हात भाजून घेयचो मी आई छान बदडायची,
गौरी गणपतीत मंडळात साडी घालून केलेले डान्स धोतर गालून केलेली नाटकं त्यावेळी कै. बापू आम्हाला धोतर नेसवायचे अगदी सोगा काढून इथेच कलेला वाव मिळाला आमच्या तात्या (संतोष) मुळे पण आता गणपतीत डान्स नाटक करण्यात कुणाला वेळ नसतो खंत वाटते.
खरी मजा येते ती भैरवनाथ देवाच्या याञेत अदल्या दिवशी छबिना मस्त ढोलताशे गजरात लेझिम खेळायची मजा औरच.. अन दुसर्या दिवशी शिळी याञा मटन खाऊन खाऊन कंटाळा येतो पण मजा यायची याञेत मी टिका टिक वाजवायच पञ्याच मिळायचा, कागदाच्या कोड , गाड्या, फूगे घेयचो आईसक्रीम खायचो भोलेनाथ आणि कांडीवालं सर्व मिञ मिळुन गप्पा गोष्टी करायचो.
आजून संध्याकाळी लाईट जायची मग सर्व मी अमोल रोहीणी रोहीत सारीका मुले भुता- खेतांच्या गोष्ठी सांगत बसायचो भीती वाटायची पण मजा यायची मी दिव्याजवळ येणारे किडे मारायचो वास बोलू नका ईतका छान यायचा🤣🤣
मी दिव्याची सावलीत हरीण, कुञा ,पक्षी, माणुस अशा सावल्या भिंतीवर पाडायचो अशी राञ परत कधी आली नाही परत त्या भुताच्या गोष्ठी ऐकल्या नाही.
खर खुप छान होते बालपणीचे दिवस ते मिञ
आता नोकरी निमित्त सर्व बाहेरगावी मिञ गेले याञेला भेट होते,
खर केंजळ च्या या आठवणी कायम मनात घर करूण राहतील...
- प्रा. राहूल तायडे
18/04 /2019
Comments
Post a Comment