केळशी ट्रीप

 ११ मे २०२०



भल्या पहाटे उठून माझ्या मित्राचा फोन खणाणला गुरुवारी आपल्याला केळशीला मयूर कडे जायचे झालं म्हणलं की कोकण आणि कोकण म्हटलं की तिथला समुद्र मासे मनाला भारावून टाकणारे आल्हाददायक वातावरण या सगळ्यांमुळे मला खूपच आनंद होतो सकाळी आठ वाजता माझा मित्र रवी पवार आला सकाळच्या थंड मस्त होती हवेत थोडा गारवा होता मग रवी गाडीला स्टार्टर मारला आणि आम्ही केळशी कडे कूच केली सकाळचे आल्हाददायक वातावरण मनाला भावून टाकणारी थंडी खूपच छान होती मन अगदी प्रसन्न होत होतं, पाचगणी महाबळेश्वर करत करत आम्ही निसर्गाचा आस्वाद घेत आंबेनळी घाटातून डोंगर-दऱ्या तिथून पक्ष्यांचे विविध आवाज मनाला मोहून टाकणारा निसर्ग,मधेच दिमाखात आणि तितक्याच तोऱ्यात उभा असणारा प्रतापगड सुद्धा मला दिसला भगवा सुद्धा तेवढ्याच दिमाखात फडकत होता, शिवछत्रपतींना वंदन करत,  आम्ही पोलादपूरला पोचलो तेथे मग आम्ही एका हॉटेलमध्ये चहा घेतला चहा एवढा अप्रतिम होता की आम्हाला खूप आवडला दोनदा चहा पिला मग रवींद्र जाणून घेण्याचा प्रयत्न केला चहा वाल्याकडून कसा करता चहा वगैरे वगैरे या वस्तू चहावाला रवीला म्हणाला साहेब चहा पत्ती कोणतीही असो पण चहा बनवण्यावर सगळं असतं खरंच त्या चहाला सलाम करून आणि पुढचा मार्ग धरला मग आम्ही बोलत पोलादपूर पासून पुढे रेवतळे फाट्यावरून लाटवन, कुंबळे, मंडणगड , केळशी फाटा देवारे आणि मग असं करत करत कोकणातला आनंद घेत आम्ही केळशी गावात पोहोचलो..

*हॉटेल एमजीएम*:

आम्ही आम्ही बाईक वर पोचलो ते थेट मयूरने सुरू केलेल्या त्याच्या हॉटेलवर,हॉटेल बाजारपेठेवर होतं मयूर ला भेटून आम्ही मयूर च्या घरी फ्रेश होईला  गेलो फ्रेश झाल्यावर त्या छोट्या-छोट्या गल्लीबोळातून मी हॉटेलवर रवीला आणलं, असं कोकणातल छान वातावरण  बघून रवी हरपून गेला मग हॉटेलवर आल्यावर वहिनींनी मस्त चहा केला सुंदर असा चहा पिल्यावर मी आणि रवी मार्केट मध्ये फिरायला गेलो मग जरा भुकेने हाका मारल्या वर हॉटेल कडे वळालो तोपर्यंत मयुरने छान बांगडा फ्राय, सुरमई थाळी,  सोलकडी, तांदळाची भाकरी मस्त फक्कड कोकणी जेवण तयार करून ठेवलं यावर मस्त आम्ही कोकणी ताव मारून फस्त केला पोटभर जेवल्यावर डोळे थोडे जड व्हायला लागले मग दुपारचे विश्रांतीसाठी आम्ही मयुरच्या घरी गेलो थोड्या विश्रांतीनंतर पूर्ण हॉटेलवर येऊन एक मस्तपैकी चहा पिला छान कोकणातील सुंदर आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत रवी आणि मी केळशीची मध्ये फिरत होतो.आणि फिरता-फिरता आम्ही समुद्रावर गेलो खूप छान निळाशार समुद्रकिनार्‍याला भिडणार्‍या लाटा नारळी-पोफळीची जंगल आणि याकुब बाबांचा दर्गा तसेच महालक्ष्मी मंदिराला सुद्धा आम्ही भेट दिली

*कोकण*:

केळशी तसं दापोली तालुक्यातील समुद्र किनार्‍यावर वसलेले एक छोटेसे गाव चहूबाजूनी नारळ - माडांच्या आणि सुपारीचा झाडांनी वेढलेलं, या गावात शिवाजी महाराजांचे गुरु याकुब बाबांचा दर्गा आहे आणि तो खूप प्रसिद्ध आहे तसेच इथे महालक्ष्मीचे पुरातन मंदिर आहे आणि सुंदर निळाशार खारट समुद्र सुद्धा आहे .

अशी मजा मस्ती करत रात्री पुन्हा आम्ही मग चिकन थाळी संपत आणि कॉलेजच्या आठवणींना उजाळा देत आम्हाला झोप कधी लागली हे आम्हालाच समजलं नाही.

*हर्णे बंदरावर चे सरबत*

मग गप्पा-गोष्टी करता करता रवीला मी सहज म्हणालो की हर्णे बंदरावर सरबत खूप छान मिळतं मग हे ऐकून रवी ला जरा आनंद झाला आणि मग ते सुंदरच सरबत पिण्यासाठी आम्ही  ३० किलोमीटर ट्रिपल सीट बाईक वर गेलो बंदरावर  पोचल्यावर मोठमोठ्या नावा, होड्या बघून रवीने तर तोंडाचा आ वासत  होता  मोठ्या होड्या कसं बांधत असतील एवढ्या मोठ्या होड्या वगैरे वगैरे त्या एवढ्या प्रश्नांनी त्याच्या मनात काहूर माजवलं,मग आम्ही सरबताचा गाडी जवळ थांबलो मग सोडा त्याच्यामध्ये साखर त्याच्यामध्ये लिंबू सरबत मागवलं मग रवी एकदम म्हणाला "अरे सरबत खूप थंड आहे माझा आकडा होईल" त्याचे शब्द ऐकल्यावर मला आणि मयूरला हसू आवरलं नाही आणि पहिला ग्लास संपल्यावर मग रवीने नुसता सोडा मागितला आणि तर नुसता सोडा पिल्यावर त्यानी तोंड इकडं इतके वेडेवाकडे केलं की आम्हाला पुन्हा हसू आवरलं नाही अशी मजा मस्ती करत नवनवीन माशांचे प्रकार बघत आम्ही हर्णे बंदराला निरोप दिला जाता जाता डोळ्यात समुद्रामध्ये  असणाऱ्या सुवर्णदुर्ग  किल्ला नी सुद्धा आमचं मन मोहून टाकलं आणि मग किनाऱ्यावर थोडेसे कॅमेरा मध्ये फोटो काढले.


*दुसरा दिवस*:

रवीला  आणि मला पहिल्यापासून निसर्ग प्राण्यांची आवड आवड शाळेतल्या मुला पर्यंत पोहोचावी म्हणून आणि आमचे मित्र मयूर याचा थोडासा नाव व्हावं त्यामुळे त्याच्या शाळेत आम्ही सापांविषयी वन्यप्राण्यांचे संवर्धन या विषयावर खूप छान लेक्चर घेतलं अकरावीच्या मुलांनी सुद्धा आम्हाला खूप छान दाद दिली आणि शेवट रवि नी मिमिक्री करून लेक्चर संपलं मग थोडं मयूरच्या construction साइटवर पाहणी करायला गेलो असंच मयूरला चिडवत माझ्याकडे संध्याकाळी आम्ही केळशीला पोचलो मग मी आणि रवी नी छान चुलीवर कोकणी पद्धतीने बिर्याणी बनवली पण रवी माझ्या वर जर चिडला कारण त्याला मीठा आण चटणी आण आणि तांदूळ निवडायला लावले असो पण तेवढ्यात मयुर चा फोन खणाणला की हॉटेलवर फॉरेनर पाहुणे आलेत मग काय करणार पाहुण्यांना आपणही बिर्याणी खाऊ घालायचे याची खटपट म्हणून मयूर आणि रवी गाडीवर  घेऊन हॉटेलकडे निघाले आणि मी इंग्लिश मध्ये फॉरेनर सोबत गप्पा मारल्या की आपण कुठले वगैरे वगैरे त्यांनी सांगितले आम्ही फ्रान्स वरून आलोय अॅन्डयु असे त्याचे नाव त्याच्यासोबत त्याची बायको होती मग आम्ही त्यांना बिर्याणी खाऊ घातली आणि मी माहिती दिली की हे चुलीवर बनवले वगैरे वगैरे तसेच रवी आणि मयूरची ओळख करून दिली त्यावर तो म्हणाला तुम्ही कॉलेज फ्रेंड आहात की काय? त्याने पण आमच्यातली घट्ट मैत्री ओळखली बघाना मैत्रिला कुठलीच शाळा नसते कुठला क्लास नसतो कुठला शिक्षण लागत नाही बस फक्त ती मनातून येते, मग त्याच्या सोबत आम्ही थोडे फोटो काढले आणि त्याला छान इंडियन कल्चर ची माहिती देत त्यांचा निरोप घेतला.

*कोकणातली संध्याकाळ*

मग छान संध्याकाळी आम्ही नारळाचे पाणी पिले थोडक्यात माडी रवीं ने दोन ग्लास घेतले आणि मयूर आणि मी सुद्धा दोन ग्लास पिले छान बिर्याणीवर ताव मारला आणि मस्त गप्पा गोष्टी करत आम्ही कधी झोपेच्या आधीन झालो हे आम्हालाच कळलं नाही.

*रम्य पहाट*

पहाटे काकूंनी उठून मस्त चूल पेटवली मग मी आणि रवी चुलीमध्ये लाकूड पेटवायची खटपट केली,

छान गरम गरम पाण्यात लिंबाच्या झाडाची पाने टाकून मस्त आंघोळ झाली.

*हाफ एक फ्राय*

मयुर नी आम्हाला नवीन पद्धतीने आणि फास्ट अंडे फ्राय कसे करायचे शिकवले असा छान नाष्टा करून त्यांचे फोटो काढून मी आणि रवीने अखेर केळशीचा आणि मयुर चा निरोप घेतला पण हे मनात घर करून राहणारे मनाला आनंद देणारे  कोकणातील वातावरण अनुभवायला आम्ही परत नक्की केळशीला जाणार ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेष...

धन्यवाद.


लेखन: प्रा. राहुल

 तायडे.

वाई जि. सातारा


Comments

Popular posts from this blog

किसनवीर महाविद्यालय परिसरात आढळला "क्रिसिला" रंगीबेरंगी कोळी

भुत एक अनुभव....