आठवणीतील विसापूर...

     Msc 1 मधे  आकूर्डीमधे शिकायला असताना दि 11/1/2011 रोजी मी आणि माझे मिञ शेखर, गोरख, महादेव, गणेश, वर्षा, मोहिनी संजिवनी चैताली असे सर्वांच विसापूर किल्लावर जायचं अस नक्की झालं.

    ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी 8.30 वा. आकूर्डी रेल्वेस्टेशनवर जमलो 9.30 ची लोणावळा लोकल पकडून 10 वाजता मळवली इथ पोचलो, काय सुंदर वातावरण होत सकाळचं धुंक त्यात थोडी थंडी आणि रोडवर जास्त रहदारी नव्हती. गप्पा  गोष्टी मजा करत आम्ही एक हाॅटेलजवळ पोचलो तेथे छान काॅफीचा आनंद घेत आम्ही विसापूरची वाट पकडली.

  डोंगरातली ती वळणावळणाची वाट किती अवघड पण तीही खुप छान वाटत होती सगळीकडे धरणीने हिरवी शाल पांघरली की काय अस वाटत होत डोंगरातुन येणार खळखळणारे झ-याच पाणी पिऊन आम्ही किल्ला सर करत होतो, जस जस वर वर जाव तस गांव, माणसं छोटी वाटत होती रेल्वे तर अगदी खेळण्यातली वाटत होती. थोडा आराम मजा करत अखेर आम्ही विसापूर वर पोचलो त्यावेळचं वातावरण सुंदर होतं. महादेव मधुन मधुन गोरख च्या मोबाईल मधून फोटो काढत होता. 

  खरच खुप रोमांच अंगात भरत होता, किल्ल्याची ती अभेद्य तटबंदी पाहून आठवला तो, शिवछत्रपती महाराजांचा काळ, शिवछत्रपतींचे पदस्पर्षानी विसापूरही धन्य झाला असेल, आठवले ते हिरोजी इंदलकर ज्यांनी विसापूर बांधला.

   गडाबद्दल सांगायचे म्हणटले तर किल्ल्यावर येण्यासाठी थोड्या पाय-या आहेत नागमोडी वाटेणेच यावे लागते, किल्ल्यावर पोचायच्या आधी पायरीच्या बाजूला एक मारूती देवाची मुर्ती आहे वर गडावर भुयार खोदून दोन मोठ्या खोल्या आहेत त्या काळात ती धान्य किंवा दारूगोळा साठवण्यासाठी असावित. किल्ल्यावर छोटी मोठी तळी आहेत त्यातील पाणी गोड व थंड आहे, तसेच तटबंदी मजबुत भक्कम आहे. 

   किल्ल्यावर एक खुप मोठ जातं आहे दगडाचं आम्ही खूप प्रयत्न केला पण ते जागच हल्लं पण नाही. हिंडत मजा मस्ती करत हिंडत हिंडत आमही थकलो आणि आता पोटात कावळे ओरडुन ओरडुन मेले, मग आम्ही किल्ल्यावर 3 महाल आहेत तेथे बसून जेवणाचा आस्वाद घेतला वांग्याची भाजी, चटणी, बटाट्याची भाजी, असा छान मेनू वर्षा, संजु, मोहिनी चैताली यांनी आणली होते, खुप छान जेवण झालं थोडावेळ विश्रांती फोटोग्राफी आम्ही भटकू लागलो.

    फिरता फिरता गोरख आणि गणेश लांब फिरत गेले आम्ही त्यांना शोधता शोधता परत किल्ला पालथा घातला, व आम्ही गणपती आणि महादेवाच्या मंदिराजवळ पोचलो तर ही दोघ तिथ तळ्यामधे पाय सोडून बसले होते, ते बघून शेखरलाही हुकी आली तो पाय सोडून बसला त्याची गम्मत करायची म्हणुन मी एक लाकूडाची काठी पाण्यात आपटली तसा शेखर भिजला आणि चिडला ते पाहून आम्ही खुप हसलो अशी मजा मस्ती करत फोटो काढत आणि तो हिरवागार निसर्ग आम्ही कॅमे-यात बंदिस्त केली.

    आता मुलींना घरची ओढ लागली कारण   "सात च्या आत घरात" म्हणुन किल्ल्यावरील आठवणी आणि तो दिवस मनात धरून आम्ही परतीचा रस्ता पकडला आणि 4.30 च्या पुणे लोकलने आम्ही आकुर्डीत आलो. 

  पण पुन्हा ही मजा अनुभवायला विसापूला जाणार हे नक्की ! ....

- प्रा. राहुल तायडे. 

  


Comments

Popular posts from this blog

किसनवीर महाविद्यालय परिसरात आढळला "क्रिसिला" रंगीबेरंगी कोळी

केळशी ट्रीप

भुत एक अनुभव....