प्रतापगड दर्शन सहल

 प्रतापगड दर्शन सहल

दि. 17 नोव्हेंबर 2020


भाऊबीज झाल्यानंतर आमच्या अपार्टमेंटमधील भटकी भटकंती करणारे आमचे मित्र म्हणजे महेश सुशांत राहुल ओमकार सूर्या भाई ओमकार आणि सागर सर्वांनी प्लांन ठरवला ही 17 तारखेला प्रतापगडला जायचं

      17 नोव्हेंबरला भल्या पहाटे सकाळी नऊ वाजता आम्ही वाई वरून प्रतापगड कडे कूच केली सर्वांनी आम्ही टू व्हीलर घेतल्या होत्या पाचगणी आणि मग महाबळेश्वर चे सह्याद्रीचे उंचच्या उंच कडे आणि खोल दऱ्या मन अगदी मोहून टाकत होत्या. हा घाट म्हणजे आंबेनळी चा घाट हा घाट उतरल्यावर आम्ही खाली एका हॉटेल जवळ नाष्ट्यासाठी थांबलो

मग आम्ही प्रतापगडाकडे रवाना झालो सह्याद्रीचे उंच कडे खोल दऱ्या आणि समोरच उभा असलेला अगदी दिमाखात किल्ले प्रतापगड


*वाई वरून मार्ग:-*

वाई👉 पाचगणी 👉महाबळेश्वर👉 वाडा कुंभरोशी👉 प्रतापगड


*किल्ले प्रतापगडा बद्दल माहिती*:-


या डोंगराला पूर्वी "ढोरप्याचा डोंगर" असे संबोधले जायचे ढोर म्हणजे गुरे तिथले स्थानिक लोक या डोंगराचा गुरे चारण्यासाठी वापर करत असत.

    सुरूवातीला हा किल्ला जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता चंद्रराव मोरे म्हणजे आदिलशाहीचे सरदार व जावळीचे सुभेदार..

    1656 साली हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे कडून जिंकून घेतला आणि आदिलशाही मध्ये एकच खळबळ उडाली तत्पूर्वी महाराजांनी या ढोरप्याच्या डोंगरावर मोरोपंत पिंगळे यांना किल्ला बांधण्यास सांगितले आणि दोन वर्षातच म्हणजे 1658 साली  बुलंद आणि अभेद्य किल्ल्याची निर्मिती  मोरोपंत पिंगळे आणि त्या काळातले स्वराज्याचे इंजिनियर हिरोजी इंदुलकर यांनी निर्मिती केली.

      छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेऊन संपूर्ण आदिलशाहीच हादरवून टाकली होती महाराज एकामागून एक पराक्रम करत होते त्यामुळे आदिलशहा चिंतेत होता म्हणूनच त्याने बडी बेगम सोबत विजापूरला दरबार भरवला आणि    

बडी बेगम कडाडली "हे कोई सरदार जो शिवा को जिंदा या मुरदा ला सके"

हे उद्गार ऐकून साडेसात फूट उंच, धिप्पाड , क्रुर राक्षस  अफझल खानाने पैजेचा विडा उचलला अब्जल खान म्हणजे पृथ्वीवरचा राक्षसच लोखंडी पाऱेचा ४ चा आकडा करणारा, जंगली हत्ती एवढी ताकद, नाश्त्याला एक अख्खा बोकड खाण्याची क्षमता असलेला अफझलखान ४० हजार फौज घेऊन शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी निघाला मंदिरे उध्वस्त करत खान महाराजांना पकडण्यासाठी येत आहेत हे समजताच राजे प्रतापगडावर आले चारी बाजूंनी सूर्यप्रकाश जमिनीवर पडणार नाही एवढे जावळीचे घनदाट अरण्य वन्यप्राण्यांचा सुळसुळाट असणारा गडावर शत्रू येणे अशक्य म्हणूनच महाराजांनी खानासोबत भेटीसाठी प्रतापगड निवडला.

  तिकडे खान पंढरपूर, तुळजापूर अशी धार्मिक स्थळे उध्वस्त करत मंदिरे पाडत वाई पर्यंत पोहोचला महाराजांनी त्याच्या वकीलाला खानाकडे पाठवून आपण घाबरलो आहोत असे भासवले व त्यांना प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावले आणि सांगितले आम्ही आपल्या सोबत समझोता करण्यास तयार आहोत त्यामुळे युद्ध नको हातातोंडाशी आलेला घास जाईल म्हणून खान प्रतापगडावर भेटीसाठी तयार झाला अफजल खान हा वाईचा सरदार होता त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा वाईचा होता आणि मग १२ हजाराची फौज घेऊन अफझलखान प्रतापगडाकडे निघाला महाराज तिकडे युद्धाची तयारी करू लागले प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल अशा जागी खानासाठी भव्य शामियाना उभारला होता खानाचे सैन्य ठेवून 12000 फौजेनिशी पाचगणी महाबळेश्वर मार्गे रडतोंडी घाट म्हणजे खाली खानाची फौज रडत रडत उतरली म्हणून या म्हणून या घाटाला "रडतोंडी चा घाट" असे म्हटले जाते खाली कोयना नदीच्या किनारी खाली पार गावात उतरवली या गावातून पालखीत बसून महाराजांनी उभारलेल्या शामियान्यात खान आला तेव्हा त्याची वैविध्यता पाहून आपल्या वकिलांमार्फत राजांच्या भेटीसाठी खानाने पत्र पाठवले.

    महाराज खानाचा कट ओळखून होते मग राजेंनी आपल्या वकिलांमार्फत खानाला पत्र पाठवले आणि सांगितले की आम्हास जैसे शहाजीराजे तैसे तुम्ही, आपण खानाचे भतीजे आहोत तेव्हा युद्ध नको.

  इकडे राजे योजना आखत होते आणि तिकडे खान महाराजांना कसे ठार करता येईल हा विचार करत होता पत्रात ठरलेल्या करारानुसार सोबत १० अंगरक्षक आणि ०१ वकील असे ठरले होते. 

   आणि भेटीची वेळ १० नोव्हेंबर १६६९ रोजी ठरली निशस्त्र भेटायचे ठरले असले तरी खानाने आपल्या अंगरख्याची खाली कट्यार ठेवली होती खानाकडून 100% घातपाताची शक्यता असल्याने महाराज जाणून होते त्यामुळेच राजांनी त्यांच्या अंगावर चिलखत चढवले होते आणि हातात वरून अंगठ्या आणि आतल्या बाजूने वाघनखे ठेवली होती आणि बिचवा सुद्धा लपवला होता भवानी मातेचा आणि जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन खानाच्या भेटीसाठी महाराज निघाले आणि सोबत जीवा महाला व संभाजी कावजी दोन अंगरक्षक आणि त्यांचे वकील सोबत घेतले जवळ येताच आत मध्ये असलेला सय्यद बंडा

ला पाहताच महाराज आपल्या वकिलामार्फत आपण सय्यद बंडाला घाबरतो तेव्हा अफझलखानपासून लांब राहण्याची विनंती केली. शिवाजी आपल्याला घाबरला आहे हे पाहून खान बे फकीर झाला  खानाने सय्यद बंडाला बाजूला जाण्यास सांगितले आणि खानाने महाराजांना आलिंगन देण्यासाठी हात पुढे केला आणि आलिंगन देतात खानाने महाराजांची मान डाव्या हातात पकडून खानाने कट्यारीचा वार त्यांच्या पाठीत केला अफझलखानाच्या वारात तेवढी ताकत होती की अंगरख्या खाली असलेले चिलखत देखील फाटले महाराजांना अफजलखानाने दगा केला हे कळतात हातात असलेली वाघनखे त्यांच्या पोटात घुसवली आणि खानाचा कोथळा बाहेर काढला


*फिकर ना कर बंदे ये शेर शिवा का आखाडा है जिसने एक हि झटके मे अफजल को उखाडा है*.. असे उद्गार  सागरच्या तोंडातून आपसूकच निघाले....

   

खान जोरात दगा दगा  असे ओरडू लागला मग जवळच असलेला सय्यद बंडा खानाच्या मदतीला धावून आला आणि तो राजांवर वार करणार हे पाहताच जीवा महाले मध्ये येऊन त्यांनी सय्यद बंडाचा हात खांद्यापासून वेगळा केला आणि सय्यद बंडा तेथेच कोसळला जिवा महाला यांच्यामुळे आपले राजे वाचले आणि मग म्हणून म्हण प्रसिद्ध झाली "होता जीवा म्हणून वाचला शिवा"

इकडे खान जखमी अवस्थेतून त्याच्या पालखी कडे निघाला तोच संभाजी कावजी यांनी पालखी वाहणार्‍या भोयांच्या पायावर वार केला आणि जखमी अफझलखानाला ठार करून त्याचे शरीर धडापासून वेगळे केले खान ठार झाला हे पाहतात त्याचे सैन्य पळू लागले तेव्हा राजांनी आपल्या सैन्याला खानाच्या सैन्यावर आक्रमण करण्याची आज्ञा केली अचानक झालेल्या आक्रमणामुळे बेसावध असलेल्या खानाच्या सैन्याची पळताभुई थोडी झाली आणि खानाचे पाच हजार सैन्य मारले गेले आणि 3000 सैन्य पकडले गेले खानाचा चांगलाच पराभव झाला संभाजी कावजी यांनी आणलेले खानाचे मुंडके महाराजांनी  भेट म्हणून रायगडावर पाठवले आणि आजही तो दिवस शिवप्रताप दिन म्हणून ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या या अविस्मरणीय प्रतापाला  प्रतापगड हे नाव पडले अशा या अविस्मरणीय महाराजांच्या पराक्रमाला त्रिवार मुजरा.

           *किल्ल्याविषयी माहिती*:-

    किल्ल्याच्या पायऱ्या शेजारी जवळच डाव्या बाजूला एक गुहा दिसते जाणकारांकडून सांगण्यात येते की अफजल खानाच्या भेटीसाठी महाराज निघाले होते त्यावेळी गुहेमध्ये शत्रूवर हल्ला करण्याकरता 40 मावळे लपवले होते 

पायर्‍या चढून गेल्यावर किल्ल्याची पूर्ण तटबंदी 5 किलोमीटर आहे, हा किल्ला मोरोपंत पिंगळे आणि हिरोजी इंदुलकर यांनी दोन वर्षात बांधला शेजारी एक पायवाट दिसते ती थेट रायगडापर्यंत जाते गावातील लोक ये-जा करण्यासाठी ही पायवाट वापरतात महाराज सुद्धा रायगडावर जाण्यासाठी हीच पायवाट वापरत होते साधारण 65 किलोमीटर अंतर त्या काळचे मावळे पायी चालत होते पुढे काही पायर्‍या चढून आल्यावर पश्चिम मुखी दरवाज्याची रचना अशी आहे की तो त्याच्या साहाय्याने किंवा हत्ती वा तोफेच्या साह्याने सहज तोडता येत नाही आणि खालून दरवाज्याचा अंदाजही येत नाही

   निमुळत्या वाटेतून शत्रू जरी वर आला तरी या तटबंदीमध्ये असलेल्या छिद्रातून धनुष्यबाण तोफा डागण्यात येत असत आणि एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना असलेला उतार याकरिता की धनुष्यबान तोफांच्या माऱ्याने मधून शत्रू जरी वाचला आणि भिंतीला टेकून लपून बसला तरी या छिद्रांमधून उकळलेले तेल शत्रूच्या अंगावर ओतन्यात येत असे महाद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन शिल्पे कोरलेली आहेत

   आणि आजही साडेतीनशे वर्षे जुने असलेले गडाचे महाद्वार महाराजांच्या रीतीनुसार सूर्योदयापूर्वी उघडतात आणि सूर्यास्तानंतर बंद करतात महाद्वारातून आत प्रवेश करताच द्वाररक्षकां साठी असलेल्या खोल्यांमध्ये उजव्या बाजूला तोफ  व मशाली ठेवण्यासाठी चा दगडी स्टॅन्ड पहावयास मिळतो महाद्वार आणि उजव्या हाताने वर गेल्यावर चिलखती बांधणीचा बुरुज पाहावयास मिळतो याला चिलखती अशामुळे म्हटलं की सैन्य शत्रूपासून सुरक्षित राहिलं पण शत्रू वाचणार नाही यासाठी या बुरुजाची केलेली ही रचना व डाव्या हाताला भवानी मातेचा मंदिरापर्यंत जाण्यासाठी जुनी पायवाट दिसते पण आता ती वाट बंद आहे नवीन वाटेने वर आल्यावर उजव्या हाताला गडावर पिण्याच्या पाण्याचे तलाव पहावयास मिळतो आजही गडावरील माणसे हे पाणी पिण्यासाठी वापरतात तेथूनच काही पायर्‍या चढून आपण भवानीमातेच्या मंदिरात पोहोचतो मंदिरात भवानीमातेची प्रसन्न मूर्ती आपणास पहावयास मिळते ही मूर्ती शिवाजी महाराजांनी नेपाळमधून गंडकी नदीतून शाळीग्राम आणून घडवली हा इतिहास सांगतो मूर्ती शेजारी आपल्याला शिवकालीन स्पटिकरुपी शिवलिंग पहावयास मिळते राजे या शिवलिंगाची रोज पूजा करत असत गाभाऱ्यामध्ये मातेच्या मूर्ती समोरच काचेमध्ये ठेवलेल्या शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार पहावयास मिळते आणि त्या तलवारीवर सहा स्टार देखील पहावयास मिळतात महाराजांच्या काळात शंभर गनिम मारल्यावर एकच स्टार अशी पदवी बहाल केली जात असे आणि महाराजांनी अफजलखानाचा वध केला त्या वेळी गनिमांवर तुटून पडलेल्या हंबीरराव मोहिते यांनी सहाशे गनिमांचा खात्मा केला होता या पराक्रमाचे बक्षीस म्हणून महाराजांनी त्यांना सहा स्टार बहाल केले होते त्यांचे पुरावे आजही या तलवारीवर पहावयास मिळतात

   मंदिराबाहेर लोखंडी स्टॅन्ड वर सहा वेगवेगळ्या तोफा पहावयास मिळतात पहिल्या रिंग वाल्या तोफेचा चा उपयोग मावळे आपल्या खांद्यावर घेऊन शत्रूवर मारण्यासाठी करत असत मंदिराशेजारीच नगरखाना आणि सभामंडप आहे इथून खाली पाहिले असता जावळीचे खोरे आणि शिवप्रताप बुरुज पहावयास मिळतो पुढे उंच ठिकाण असलेल्या बालेकिल्ल्याकडे आम्ही पोचलो आत आल्यावर दरवाजा आणि डाव्या हाताला केदारेश्वराचे मंदिर पहावयास मिळते हे शिवलिंग स्वयंभू आहे तसेच मंदिरासमोर सदर पहावयास मिळते युद्धापूर्वी होणारी खलबते याच सदरेतून होत असत मंदिराजवळ एक चोर दरवाजा दिसतो याचा उपयोग मावळे शत्रू बालेकिल्ल्यात पर्यंत जरी पोहोचला तरी या चोर दरवाजाने गडाबाहेर जाऊन पुन्हा शत्रूवर मागुन आक्रमण करण्या करता करत असत तटबंदीवरून पुढे चालत आल्यावर आपल्याला कडेलोट पॉईंट पहावयास मिळतो तसेच या तटबंदीवरून आपल्याला रत्नागिरी जिल्हा पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा यांचे बॉर्डर पहावयास मिळते तटबंदी वरून खाली आल्यावर अश्वारूढ महाराजांचा पुतळा दिसतो इथे महाराजांचा पूर्वी राहता राजवाडा होता या पुतळा याचे उद्घाटन 30 नोव्हेंबर 1957 रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते संपन्न झाला


माझ्या मायभूमीचे रक्षण करणे हेच माझे परमकर्तव्य आहे या भूमीवर आक्रमण करू पाहणारा कोणीही असो तो कधीही यशस्वी होणार नाही हे राजांचे उद्गार


राजांचे शौर्य व कर्तुत्व एवढे मोठे आहे की त्यांची तुलना फक्त जगज्जेत्या अलेक्झांडरशीच होऊ शकते हे गोव्याच्या पोर्तुगीज  गव्हर्नर चे उद्गार आपल्याला चौथऱ्यावर पहावयास मिळतात

    *शिवप्रताप बुरुज*:-

शिवप्रताप बुरुजावर शिवाजी महाराजांचे अंगरक्षक संभाजी कावजी यांनी महाराजांना भेट म्हणून खानाचे मुंडके या बुरुजावर आणले होते आणि त्याचे धड गडाखाली असलेल्या शामियाना खाली पुरण्यात आले होते अशा या महाराजांच्या शौर्य पराक्रमाला त्रिवार मुजरा.


    पुढे आम्ही छान मसाला ताक वीस रुपये देऊन पिले मग थोडे फोटो काढून आम्ही तीन वाजता किल्ल्यावरून खाली सह्याद्री हॉटेल कडे निघालो आम्हा सगळ्यांनाच खूपच भूक लागली होती मग आम्ही सर्वांनी चिकन थाळी घेतली 220 रुपये एकदम छानच होती, जेवणाची सुशांत मुळे एवढ्या छान हॉटेलमध्ये सोय झाली, आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला आणि चार वाजता वाईकडे  येण्याचा मार्ग धरला घनदाट झाडीतून जाताना सह्याद्रीच्या या  पर्वतरांगा आम्हाला परत येण्यासाठी साथ देत होत्या अशा या अभेद्य प्रतापगडाला मुजरा करून आम्ही वाईकडे परतीच्या मार्गाला लागलो अशी ही सुंदर ट्रीप आमच्या कायम स्मरणात राहील.


*शब्दांकन:- प्रा. राहुल तायडे*


Comments

Popular posts from this blog

भुत एक अनुभव....

केंजळ गावातील बालपणीचे दिवस....