किसनवीर महाविद्यालय परिसरात आढळला "क्रिसिला" रंगीबेरंगी कोळी
*किसनवीर महाविद्यालय परिसरात आढळला "क्रिसिला" रंगीबेरंगी कोळी:* जगामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आढळतात काही रंगीबेरंगी असतात तर काही पूर्णपणे रंगही नसतात काही खूप मोठे असतात तर काही इतके लहान असतात की डोळ्यांना नीट दिसतही नाहीत वाई मधील किसनवीर महाविद्यालयाच्या परिसरात क्रिसिला हा रंगीबिरंगी कोळी आढळला. कीटकांवर संशोधन करणारे डॉ. विश्वास देशपांडे आणि आणि प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हणमंतराव कणसे आणि प्रा. राहुल तायडे यांनी माहिती दिली की,जगामध्ये आजपर्यंत 51,293 प्रकारचे कोळी सापडले आहेत यामध्ये ६७४ वर्ग आणि १३२ कुटुंब त्यापैकी हा क्रिसिला कोळी सॅल्टीसिडे कुटुंबातला उडी मारणाऱ्या कोळ्यांची प्रजाती मधला आहे. ज्याचे वर्णन प्रथम 1887 मध्ये थोरेल यांनी केले होते.या प्रजातीमध्ये मादी २ ते ४ मिलिमीटर आणि नर ४ ते ९ मिलिमीटर लांब असतात,त्यांच्या अंगावर लाल , नारंगी रंगाचे दोन इंद्रधनुषी निळे पट्टे असतात तसेच ८ पाय असून ते पिवळ्या रंगाचे असतात व पुढचे दोन पाय इतर पायांच्या तुलनेत लांब असतात. हा कोळी गवत, जमीन, झाडाची साल, पाने , फळे या जागी आढळतात.